
कुडाळ – जिल्हा परिषदेच्या म्हसवे गटात वसंतराव मानकवरे भाऊ यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. गेल्या 30-35 वर्षाचे राजकारणात वसंतराव मानकुमरे यांचे प्रत्येक गावातील वाडी वस्तीतील लोकांशी जवळून संबंध आलेले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या त्यांच्या स्वभावाने मतदारांशी त्यांचे खूप चांगले ऋणानुबंध आहेत.भाऊंनी आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत या विभागात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे तर दुसरीकडे कर्तृत्वशून्य व्यक्ती त्यांच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नसून म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे भाऊ यांचातसेच पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार यांचा विक्रमी मतांनी विजय निश्चित होईल असा विश्वास भाजपाचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी व्यक्त केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले आहेत नामदार बाबाराजेंची मानकुमरे भाऊंना भक्कम साथ आहे. जिल्हा परिषदेतील कामकाजाचा त्यांना तब्बल दहा वर्षाचा अनुभव आहे गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तळमळीने काम केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत त्यांच्या माध्यमातून धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी केलेली वेगवेगळी आंदोलने प्रसंगी दाखल झालेल्या केसेस हे सर्वज्ञात आहेत त्यामुळे म्हसवे गटातील जनता वसंतराव मानकुमरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून ते जिल्ह्यात एक नंबरचे मताधिक्य घेऊन निवडून येतील असे संदीप परामणे यांनी स्पष्ट केले.
गाव भेट दौऱ्यात म्हसवे गटातील प्रत्येक गावागावात मानकुंमरे भाऊंच्या प्रचार यात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना आणण्यात आली असून त्यामुळे महिला वर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी अत्यंत विश्वास आहे. या निवडणुकीत सुद्धा महिलावर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास परामणे यांनी व्यक्त केला.
