Thursday, February 19, 2026
HomeTop Newsयापुढे कोरोना बाधितांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य - सोपान टोम्पे

यापुढे कोरोना बाधितांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य – सोपान टोम्पे

ओळख लपविण्यासाठी कोरोना बहादरांची बनवाबनवी ; अनेकांनी सांगितले कुडाळ माझे गाव.

सूर्यकांत जोशी कुडाळ – होमक्वारंटाईन रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.त्यामुळे यापुढे  लक्षणे नसलेल्या ग्रामस्तरीय संस्थात्मक विलगीकरण कक्षात रहावे लागेल.प्रत्येक गावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती जावली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली आहे.

            कुडाळ येथे प्राथमिक शाळेतील ग्रामस्तरीय विलगिकरण सेंटरची पाहणी उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केली.यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते.डाॅ.अनंत वेलकर , उपसरपंच सोमनाथ कदम, पिंपळबनचे अध्यक्ष महेश पवार उपस्थित होते. यावेळी विलगीकरण कक्षातील सुविधांचा आढावा प्रशासनाने घेतला.तसेच आशा व अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शक सूचना केल्या.

        दरम्यान आपली ओळख लपविण्यासाठी अनेकांनी कोरोना चाचणी दरम्यान स्वतः चे गाव न सांगता कुडाळ माझे गाव सांगितले.त्यामुळे कुडाळ मध्ये बाधितांचे आकडे वाढल्याचे आज निदर्शनास आले.प्रशासनाकडे कुडाळ मध्ये  आजच्या तारखेला ५२ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या दिसत होती.त्यामुळे कुडाळ गाव प्रशासनाच्या हिटलिस्टवर होते.परंतु प्रत्यक्षात कुडाळ मध्ये सतरा अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे आपली ओळख लपविण्यासाठी अनेकांनी कुडाळ चे नाव सांगून बनवाबनवी केल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page