सूर्यकांत जोशी कुडाळ- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत गणपती बाप्पांना भक्ती भावपूर्ण वातावरणात आज निरोप देण्यात आला. काही कुटुंबात गौरी सोबत गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. कुडाळ येथील निरंजना नदीकाठी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येते. यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्माल्य नदीत विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून निर्माण साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती कुडाळ ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामपंचायतच्या या आव्हानाला प्रतिसाद देत निरंजना नदी स्वच्छ राहावी या हेतूने निर्माल्य दान केले.
दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांच्या आगमन होते. बाप्पांच्या आगमनानंतर घराघरात धार्मिक वातावरण तयार होते दररोज सकाळी व संध्याकाळी श्रींची पूजा व आरती प्रसाद या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते गौरीचा सण म्हणजे महिला वर्गांसाठी परभणीच असते दरवर्षी गौरी सजावटीसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात सजावटीसाठी आणले जाते.विविध प्रकारचे फराळ पदार्थ फळे इत्यादी मांडून सजावट केली जाते काही ठिकाणी सजावटीसाठी स्पर्धा भरवले जातात महिलावर्ग एकमेकांच्या घरी हळदी कुंकुसाठी जातात. गौरींचे आगमन पूजन आणि विसर्जन कार्यक्रम असतात नंतर संध्याकाळी वेळ येते ते बाप्पांच्या विसर्जनाची. संध्याकाळी बाप्पांची विधिवत पूजा करून महानैवेद्य आरती प्रसाद इत्यादी सोपस्कार केले जातात. त्यानंतर घरातील सर्वजण मनोभावे बाप्पांना बाप्पांच्या चरणी लीन होतात आणि वर्ष सुखा समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करतात मग सुरू होते ते गणपती बाप्पांची निरोपाची. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजराच्या विरोधात बाप्पांना विसर्जन स्थळे आणून विसर्जन केले जाते.