Monday, April 6, 2026
HomeTop Newsवेबसाईटच्या माध्यमातून पिंपळबनची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल - संतोष बोराटे

वेबसाईटच्या माध्यमातून पिंपळबनची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल – संतोष बोराटे

पिंपळबन वेबसाईट लोकार्पण करताना संतोष बोराटे व ग्रामस्थ

सूर्यकांत जोशी कुडाळ – गावातील निरुपयोगी व पिढ्यानपिढ्या पडिक राहिलेल्या जागेवर आज पिंपळबनच्या माध्यमातून नंदनवन फुलले आहे. पिंपळबनच्या संकल्पनेला कुडाळ गावातील जेष्ठ व युवा वर्गाने नियोजन बद्ध काम करुन मूर्त रुप दिले. पिंपळबनची ही यशोगाथा भावी पिढ्याना चिरकाल मार्गदर्शक ठरावी यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यामाध्यमातून पिंपळबन निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यांवरील घडामोडींचे संकलन करण्यात येत असून पिंपळबनच्या यशोगाथेने आता खर्या अर्थाने सिमोलंघन केले आहे. वेबसाईट च्या माध्यमातून कुडाळच्या पिंपळबनची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली असल्याचे प्रतिपादन वेबसाईट चे निर्माते व संगणक अभियंता संतोष बोराटे यांनी केले.

         कुडाळ येथील आपल्या  “*आपलं पिंपळबन*”  या नैसर्गिक व सामाजिक उपक्रमाच्या वेबसाईटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.लॉकडाउनच्या काळातील वेळेचा योग्य वापर करून तयार करण्यात  आलेल्या या वेबसाईटचा “संकल्पना ते  लोकार्पण” हा प्रवास खूपच सुंदर आणि आनंददायी होता.  पिंपळबन मित्र समूहाच्या  संकल्पनेतुन, नियोजनातून आणि परिश्रमातून  वेबसाईट पूर्णत्वास नेहण्यासाठी आपणास बहुमोल सहकार्य झाले.या वेबसाईटचे लोकार्पण झाले याचा आम्हा सर्वाना अतिशय  आनंद होत आहे असे यावेळी बोराटे यांनी सांगितले.

           हा प्रकल्प सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.या साठी

*www.pimpalbankudal.com*यावेबसाईटला सर्वानी अवश्य भेट द्यावी असे आवाहन महेश पवार यांनी केले.यावेळी पिंपळबनचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page