Thursday, February 19, 2026
HomeTop Newsशहीद शशिकांत मोरे यांचा स्मृतिदिन प्रेरणादायी

शहीद शशिकांत मोरे यांचा स्मृतिदिन प्रेरणादायी

मेढा दि ८ प्रतिनिधी : शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांचा स्मृतीदिन विद्यार्थ्यांनबरोबर भावी पिढीला प्रेरणादायी असून त्यांनी देशासाठी दिलेले बलीदान अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन जावळीचे प्रांतधिकारी सोपान टोंपे यांनी केले
सावली येथे शहीद शहीद पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रांतधिकारी सोपान टोंपे बोलत होते . माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ अध्यक्षस्थानी होते
यावेळी सदाभाऊ सपकाळ म्हणाले शहीद शशिकांत मोरे यांचे स्मारक उभारणीसाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल
प्रारंभी शहीद शशिकांत मोरे यांच्या प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ गट विकास अधिकारी रमेश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने जावळीच्या सभापती जयश्रीताई गिरी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती अमित कदम जावली बँकेचे चेअरमन राजाराम ओंबळे संचालक विजय मोकाशी आनंदराव सपकाळ प्रशासक ए पी पवेकर मामुर्डी सोसायटीचे चेअरमन आनंदराव जुनघरे सरपंच नंदाताई जुनघरे उपसरपंच दुर्योधन जुनघरे मंडळाचे अध्यक्ष नामदेव जुनघरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ उपाध्यक्ष आनंदराव जुनघरे वसंतराव मस्कर राजन जुनघरे तुकाराम जुनघरे वीर पिता तुकाराम मोरे विश्वासराव जुनघरे पोलीस पाटील संजय कांबळे केंद्रप्रमुख मिलिंद जगताप मुख्याध्यापक आर टी दळवी व अहिल्या निंबाळकर सरपंच विजय सपकाळ बजरंग चौधरी विष्णु लकडे विलास शिर्के ग्रामसेवक संजय जुनघरे तलाठी अंबवणे आदी उपस्थित होते
यावेळी गुणवंत व विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शहीद पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मोरे अकॅडमीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच जावळी चे सुपुत्र ओंकार पवार यांची आयपीएस अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आर टी दळवी यांनी सुत्र संचालन केले सुरेश मोरे यांनी स्वागत केले विजय सपकाळ यांनी आभार मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page