सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या कुडाळच्या श्री पिंपळेश्वर -आनंदीदेवी व श्री वाकडेश्वर – जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सोमवारी रात्री बारा वाजता शासनाच्या नियमानुसार संपन्न झाला.
कुडाळ व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रींचा विवाह सोहळा आणि यात्रा म्हणजे मोठी पर्वणी असते.रात्री बारा वाजता संपन्न होणाऱ्या या विवाह सोहळ्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक येतात.परंतु गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे अगदी पाचच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
श्रींची यात्रा बुधवार दि.५ व ६ रोजी असून या यात्रेवर ही कोरोनाच्या निर्बंधाचे सावट असणार आहे.