Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसभासदांच्या प्रेम आणि विश्वास यामुळेच लालसिंगराव शिंदे पतसंस्थेची घोडदौड कायम : सौरभ...

सभासदांच्या प्रेम आणि विश्वास यामुळेच लालसिंगराव शिंदे पतसंस्थेची घोडदौड कायम : सौरभ शिंदे



*कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न*



कुडाळ – सहकार महर्षी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांनी 37 वर्षापूर्वी सर्वसामान्य जनतेची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना केली. गेल्या 37 वर्षात अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या परंतु सभासदांचा नेतृत्वावरील विश्वास आणि आजपर्यंतच्या विश्वस्त मंडळांनी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून सभासदांचा विश्वास जपला सभासदांनी सुद्धा स्वर्गीय लालसिंगराव काका आणि स्व.राजेंद्र शिंदे यांना जो प्रेम आणि विश्वास दिला तोच आजही कायम आहे. सभासदांच्या प्रेम आणि विश्वास यामुळेच पतसंस्थेचे घोडदौड गेली 37 वर्षे कायम आहे.

या पुढील काळात सुद्धा सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली. *कुडाळ (* ता. जावली) येथील कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ अंकिता सौरभ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली..


            प्रारंभी  संचालक जितेंद्र खरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभेची सुरुवात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. श्रद्धांजली ठराव संचालक *राहुल बावकर* यांनी मांडला.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल *सौ. अंकिता शिंदे* यांनी सादर केला. व्यवस्थापक *प्रकाश शिवणकर* यांनी नोटीस व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संस्थेचे संचालक *रवींद्र निकम ( सर )* यांनी प्रास्ताविक करत सभासदांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

*मार्गदर्शक संचालक सौरभ शिंदे* यांनी संस्थेच्या व्यवसायात झालेल्या उल्लेखनीय वाढीचा सविस्तर आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सभासद उत्तम पवार, धनंजय केंजळे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम पवार, तसेच वसंतराव तरडे साहेब यांनी चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली.

सभेच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष *रघुनाथ तरडे* यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page