HomeTop Newsसातारा जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत कुडाळच्या खेळाडूंचे यश

सातारा जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत कुडाळच्या खेळाडूंचे यश

कुडाळ – साकुर्डी तालुका कराड येथे संपन्न झालेल्या अकराव्या सातारा जिल्हा युनि फाइट अजिंक्यपद स्पर्धेत कुडाळच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले .विविध वय आणि वजन गटात खेळाडूंनी अठरा पदकांची कमाई केली

विजेते खेळाडू खालील प्रमाणे कुमार अर्चित निलेश पवार, गौरव राजेंद्र साळुंखे,स्वराज अतुल भिसे, अर्श लखन पवार, कुमारी अनुष्का अविनाश गोंधळी,विनोद प्रभाकर डबडे,जयंत संदीप भिसे यांनी सुवर्णपदक पटकाविले. श्लोक गौरव पोरे,आदेश रमेश धोंडे,कुमारी श्रावणी राजेंद्र साळुंखे,शिवराज अतुल भिसे, स्वरा गणेश बारटक्के यांनी रजत पदक पटकावले तर अर्पित निलेश पवार, सानवी रमेश धोंडे,मनस्वी गणेश कुंभार, वरद विद्याधर पोपळे,अनंत संदीप भिसे, श्री राज संजय वायदंडे यांनी कास्य पदकाची कमाई केली

यशस्वी विद्यार्थ्यांना श्री अविनाश गोंधळी,पुरुषोत्तम मोहिते,विनोद डबडे,अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेसाठी वाई खंडाळा जावली सातारा मान पाटण कराड कोरेगाव खटाव तालुक्यातील 219 खेळाडूंनी भाग घेतला होता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular