
फोटो – जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड.
कुडाळ – 21
मा. ना. सर्वोच्च न्यायालय,मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी मेढा येथील दिवाणी न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन न्या. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .
त्या प्रसंगी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री आर एस पोफळे, श्रीमती ए के शेटे, श्रीमती शेख, श्री जाधव, श्रीमती ए आर पवार, श्रीमती एन एस पवार, श्री कणसे , सहा सरकारी वकील उपस्थित होते.
या प्रसंगी जावली तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड यांनी सामाजिक न्याय हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महान व्यक्तींनी आपल्या कार्यातून सामाजिक न्याय ही संकल्पना समाजासमोर आणली आहे. व्यक्ती-व्यक्ती मध्ये जात, धर्म, वंश, पंथ, वर्ण, जन्मस्थान, लिंगभाव या सामाजिक आधारावर भेदभाव न मानता, प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे सामाजिक न्याय होय. कृत्रिम सामाजिक भेदभावावर आधारित अन्याय्य व्यवस्थेवर केलेला मानवी उपाय म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय ही बहुआयामी संकल्पना आहे असे म्हटले. तसेच जागतिक सामाजिक न्याय दिन ” सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी नूतनीकृत वचनबद्धता ही २०२६ ची थीम असल्याबाबत सर्वांना सांगितले. तसेच उपस्थितांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सामाजिक न्याय दिनाचे महत्व समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमात श्रीमती ए के शेटे यांनी जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त उपस्थितांना साध्या सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन केले. सामाजिक जीवना मध्ये जगात असताना कायद्याचे भान ठेवून व त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले.
.सदर कार्यक्रमा चे आभार प्रदर्शन श्रीमती एन एस पवार यांनी करून आपल्या प्रभावी शब्दांनी सामाजिक न्याय दिवसा बद्दल थोडी माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच कोर्ट कॉन्स्टेबल श्री सागर मोरे हे ही उपस्थित होते.