HomeTop Newsसायगावचे पोलीस पाटील सुहास भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे जावलीत कौतुक ; सव्वा चार...

सायगावचे पोलीस पाटील सुहास भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे जावलीत कौतुक ; सव्वा चार लाखाचे सापडलेले सोने पोलीस ठाण्यात केले जमा

    

.      

सायगावचे पोलीस पाटील सुहास भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे जावलीत कौतुक ; सव्वा चार लाखाचे सापडलेले सोने पोलीस ठाण्यात केले जमा

सूर्यकांत जोशी कुडाळ दि ५ : सध्या जगात प्रामाणिकपणा  अपवादानेच दिसत असल्याने दिलासा मिळत आहे. याची प्रचिती सायगाव येथे पाहण्यास मिळत आहे. सव्वा चार लाखाचे सोने रस्त्यावर पडले होते. हे सोने उचलून मेढा पोलिस ठाण्यात जमा करून पोलीस पाटील सुहास भोसले यांनी एकआदर्श निर्माण केला आहे. सुहास पाटील यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, सायगाव ता जावळी येथे दैनंदिन काम करून खर्शी तर्फ कुडाळ ता जावळीचे पोलीस पाटील सुहास भोसले हे आपल्या दुचाकी वाहनातून रविवारी रात्री घरी निघाले होते. रस्त्यावर मोटारसायकल हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना सोनेरी वस्तू पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती वस्तू उचलून थेट मेढा पोलीस ठाण्याचे स पो नि निळकंठ राठोड यांना त्वरित याबाबत मोबाईलवर सांगितले. रात्रीची वेळ असल्याने सकाळी सापडलेली सोनेरी वस्तू घेऊन या अशी सूचना केली. त्यानुसार पोलीस पाटील सुहास भोसले यांनी सकाळी मेढा पोलीस ठाणे गाठले. मेढा बाजारातील एका सोनाराकडे ती वस्तू  पोलिसांना सोबत घेऊन दाखविली. त्यावेळी ते सोन्याचेच दागिने असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे वजन केले असता त्याचे वजन आठ तोळे तीन ग्रँम पाचशे मिली एवढे भरले. सदर दागिने स पो नि राठोड यांच्याकडे सोपविण्यात आले. सोन्याची खात्री पटवून ते मालकाला देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान, सायगाव येथील एका महिलेचे दागिने पडल्याची चर्चा होऊ लागली आहे. मेढा पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर दागिने देण्याची ठरविल्याने दागिने मालकाचा जीव भांड्यात पडला आहे.  यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलीस पाटील भोसले यांनी अनेक विधायक उपक्रमात सहभागी होऊन कर्तव्य जपलं आहे.सुहास पाटील यांच्या प्रामाणिक पणाची सपोनि निळकंठ राठोड यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच तालुक्यातील सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular