Thursday, February 19, 2026
HomeTop Newsस्वराज्य परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रेरणादायी - नितीन तारळकर : विविध क्षेत्रातील दोनशेहुन...

स्वराज्य परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रेरणादायी – नितीन तारळकर : विविध क्षेत्रातील दोनशेहुन अधिक गुणिजण सन्मानित

सूर्यकांत जोशी कुडाळ : आपल्या कुशाग्र बुद्धीने व मेहनतीने काम करून यश मिळवल्यानंतर पुरस्कार रुपी शाब्बासकीची थाप पाठीवर मिळाल्यास पुढील यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळत असते.स्वराज्य गुनीजन गौरव विकास परिषद सातारा यांच्या माध्यमातून दिले गेलेले पुरस्कार अतिशय प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्य गुंजन गौरव विकास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी, राज्यस्तरीय व्यक्ती विशेष, राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी ,व देश सेवेसाठी आपली सेवा बजावताना वीर मरण आलेले जवानांना मरणोत्तर पुरस्कार कुडाळ ता. जावली येथे एका खास कार्यक्रमातनुकतेच प्रदान करण्यात आले . या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक धनंजय चोपडे , पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प.महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे, जिल्हा क्रीडा कार्यालय समन्वयक शिवाजी निकम , छत्रपती राजश्री शाहू कला क्रीडा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव ,द युवा ग्रामीण पत्रकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री जीवन मोहिते , प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे ,कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, संजय शिंदे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य स्थानिक कुडाळ मधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर ,मुंबई, अहिल्यानगर, पुणे, लातूर, रायगड, नागपूर, बुलढाणा या ठिकाणावरून आदर्श शिक्षक उपस्थित होते. यामध्ये राम उदिकर नाशिक, श्रीकर रेळेकर सातारा, निलेश भोसले नवी मुंबई, संकेत थोरात अहिल्यानगर ,राजेश ढेकळे जेजुरी, विष्णुपंत पाटील पुणे ,सौ पूजा वाघ सातारा ,डॉ महादेव शिंदे रायगड, रविकांत वेदपाठक सातारा ,योगेश यादव सातारा, दिलीप चव्हाण वाई सातारा ,नरेश लोहारा पाचगणी, गणेश गिरी लातूर, किरण यादव नागपूर, आंचल राऊत नागपूर, इमरान शेख बुलढाणा, काजल राऊत नागपूर, विनो दधारे नागपूर, ज्योत्सना वायदंडे सातारा, अशोक शेवते कुडाळ प्रगतशील शेतकरी, सुनील जाधव सर व्यक्ती विशेष पुरस्कार, शहीद जवान अंबादास पवार स्वराज्य मरणोत्तर पुरस्कार ,श्री नितीन मोहिते जावली, प्रशांत मोरे सर कवठे, सातारा गिरीश मखमले सर बुलढाणा, संगीता बैले कराड, रेखा कसबे कराड, बाळकृष्ण भंडारे सातारा ,सतीश बुद्ध साहेब आदर्श प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती सातारा, सीमा डेरे कवठे वाई, सीमा पार्टी जावली, प्रमिला राठोड , वाई,सचिन काळे एक्स आर्मी रिटायर कुस्ती कोच वडूज, या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. या संस्थेच्या वतीने हा उपक्रम घेण्याचे तिसरे वर्ष आहे ,हा कार्यक्रम असाच कायम पुढे चालत राहवा अशा विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वराज्य परिवाराच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली होती ,या विद्यार्थ्यांची गुणगौरव 150 विद्यार्थ्यांना विविध गुणात यश मिळवल्याबद्दल 150 विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आला मुलांना मिळाला व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले शिक्षकांना मानपत्र ट्रॉफी ऑफिशियल बॅच देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोंधळ, उपाध्यक्ष अजित वाडकर,सचिव नितीन सूर्यवंशी,सदस्य विलास मिसाळ आप्पा मोहिते,कविता गोंधळी मॅडम, आदरणीय सदस्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेत्री सौ आधाटे ( जोगेश्वराचा माझा पती फेम)यांनी केली तर, यादी वाचन उपाध्यक्ष अजित वाडकर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव नितीन सूर्यवंशी यांनी केले, आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष अविनाश गोंधळी यांनी केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page