Thursday, February 19, 2026
HomeTop Newsस्व. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास जिल्हा स्तरीय स्पर्धेत कुडाळ प्राथमिक शाळेचे नेत्रदीपक...

स्व. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास जिल्हा स्तरीय स्पर्धेत कुडाळ प्राथमिक शाळेचे नेत्रदीपक यश

सूर्यकांत जोशी कुडाळ -स्व.यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कुडाळ च्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व वक्तृत्व प्रकारात नेत्रादीपक यश मिळवले. सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षा करिता स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हास्तरीय लोकनृत्य मोठा गट स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कुडाळच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व मोठा गट स्पर्धेत राजवीर सागर शिंदे – प्रथम क्रमांक,जिल्हास्तरीय निबंध लहान गट स्पर्धेत नेहा सुधीर मोहिते हिने द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, कुडाळ च्या सरपंच सुरेखा कुंभार, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम,.गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,शिक्षणविस्तार अधिकारी अरविंद दळवशी,चंद्रकांत कर्णे,शंकर बिरामणे,मुख्याध्यापिका सौ.जयश्री गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कुडाळ, यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page