Monday, April 6, 2026
HomeTop News???? म्हसवे वडाचे स्वागत कमानीसह पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज! ऐतिहासिक वटवृक्षाचा ठेवा पर्यटकांना...

???? म्हसवे वडाचे स्वागत कमानीसह पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज! ऐतिहासिक वटवृक्षाचा ठेवा पर्यटकांना भुरळ घालणार

सूर्यकांत जोशी कुडाळ : जावली तालुक्याचे प्रवेशद्वार आणि आशिया खंडातील सर्वात जुना व महाकाय वटवृक्ष म्हणून ओळख असलेल्या म्हसवे वडाचे येथे जावली तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य स्वागत कमानीचा भूमिपूजन सोहळा नुकताच ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
६.५० लाखांचा निधी, मुंबईकरांचे सहकार्य:
म्हसवे गावाच्या भौतिक सौंदर्यात भर घालणाऱ्या या स्वागत कमानीचे स्वप्न मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि मुंबई भायखळा रेसिडेन्सी, रूम नं. ३०४ व ३०५ यांच्या वतीने सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रत्यक्षात उतरले आहे. या कमानीमुळे ‘वडाचे म्हसवे’ या गावाची ओळख अधिक भक्कम झाली असून, महाराष्ट्राच्या नकाशावर ते अधिक ठळकपणे दिसणार आहे.
पर्यटन आणि दळणवळणाला मिळणार चालना:
स्वागत कमानीलगतच पाचवड–खेड कोकण राज्य मार्ग जातो. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळंकडे जाणारे अनेक पर्यटक चांगला रस्ता असल्याने म्हसवे मार्गे प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या कमानीमुळे “वडाचे म्हसवे” ही ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. भविष्यात दळणवळण अधिक सुलभ होऊन पर्यटन, लघुउद्योग आणि स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
विकासकामांना गती देणार:
यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी संपूर्ण म्हसवे गाव ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या माध्यमातून नजीकच्या काळात पर्यटन, कृषी, रस्ते, पानंद रस्ते, महू धरणाच्या कालव्याची कामे यासह विविध विकासकामांना गती मिळणार आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे म्हसवे गाव राजकीय पटलावर अग्रस्थानी राहणार असल्याचा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला.
अरुणाताई शिर्के प्रबळ दावेदार:
म्हसवे गावच्या सर्वांगीण विकासात जावली पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणाताई शिर्के यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. सलग पाच वर्षांची दैदीप्यमान कामगिरी, उच्च शिक्षण, प्रभावी वक्तृत्व व प्रशासकीय कर्तृत्व यांच्या जोरावर त्या आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे चित्र म्हसवे गणात स्पष्टपणे दिसून येत आहे.
या मान्यवरांची उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास वारकरी संप्रदायाचे प्रणेते ह.भ.प. यशवंत अण्णा शिर्के, युवा नेते व माजी उपसरपंच अजय शिर्के, अनिल शिर्के (तात्या), माजी दूध संघ उपाध्यक्ष किसनराव शिर्के, माजी सोसायटी चेअरमन अंकुश अण्णा शिर्के, विद्यमान चेअरमन मानसिंगराव गोडसे, किसनवीर साखर कामगार पतसंस्थेचे संचालक अनिल चव्हाण, कामगार नेते विठ्ठलराव पिसाळ, तसेच मारुती शिर्के, आनंदराव गायकवाड, ह.भ.प. भरत चव्हाण, पोपट चव्हाण, विठ्ठल सखाराम शिर्के, तुलसीदास शिर्के, हनुमंत शिर्के पाटील, प्रकाश शिर्के, मामा पुणेकर, भानुदास शिर्के, विश्वास शिर्के, मंगेश शिर्के, दिलीप शिर्के, सुनील जाधव, बबनराव नवले, सचिन नवले, अक्षय शिर्के, रणजित शिर्के, गणेश गायकवाड आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शिक्षक नेते सुरेश गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page