
सूर्यकांत जोशी कुडाळ -स्व. लालसिंगराव शिंदे यांच्या जयंती दिनी अजिंक्यतारा प्रतापगड कामगारांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रक्तदान करून अनोखी आदरांजली वाहिली.यावेळी तब्बल एकशे अकरा जणांनी रक्तदान करून स्व. काकांना अनोखी आदरांजली वाहिली.
अजिंक्य प्रतापगड कामगार मंडळाच्या वतीने सातारा येथील अक्षय रक्तपेढीच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी संचालक श्री प्रदीप शिंदे, विठ्ठल आबा मोरे, आनंदराव जुनघरे, दिलीप वांगडे व कार्यकारी संचालक श्री राजेंद्र भिलारे व उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रक्तदात्याना हेल्मेट, हेडफोन व जार भेट देण्यात आले.