Homeराजकीयअजिंक्य -प्रतापगड कारखाना ऊस तोडणी - वाहतुक यंत्रणा कराराचा शुभारंभ

अजिंक्य -प्रतापगड कारखाना ऊस तोडणी – वाहतुक यंत्रणा कराराचा शुभारंभ

आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले  यांच्या नेतृत्वाखाली आगामी ऊस गळीत  हंगाम यशस्वी होईल – सौरभ  शिंदे 

सूर्यकांत जोशी कुडाळ  – अजिंक्य – प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या वतीने प्रतापगड कारखान्याच्या 

2023-24 या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक 

वेळेत होण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ प्रतापगड साखर 

कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे व अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे 

यांच्यासह दोन्ही संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला.

सोनगाव ता. जावली येथील प्रतापगड साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवार ता 30 रोजी 

प्राथमिक स्वरूपात पांडुरंग तरडे, नथुराम चिकणे, अजय शिर्के, संतोष चव्हाण, दयानंद पिसाळ 

या ऊस तोडणी कंत्राटदारांनी आपला तोडणी वाहतुक करार केला. यावेळी प्रतापगड कारखान्याचे 

उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, 

प्रतापगडचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे, यांच्यासह दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे बोलताना म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद असल्याने सर्वंच घटकांना खुप अ़डचणी आल्या मात्र आमदार 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यांमुळे आता प्रतापगड कारखान्याच्या नव्या पर्वाचा उदय झाला असून अजिंक्यतारा व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने येत्या 2023-24 चे गळीत 

हंगामाची पूर्व तयारी जोमाने सुरू केलेली असून गळीत हंगामाची सुरूवात निर्धारीत वेळेत होण्याच्या दृष्टीने मशिनरी विभागाकडील मशिनरी देखभाल- दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू होणार आहेत. येणाऱ्या हंगामाकरीता कारखान्याने आतापासूनच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करारबध्द करण्याचे काम सुरू केलेले आहे. त्याचा शुभारंभ म्हणून आज ता. 30 रोजीचे 

शुभमुहूर्तावर सोनगाव येथील प्रतापगड कारखाना स्थळावर दोन्ही कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष 

व संचालक मंडळाच्या शुभहस्ते ऊस तोडणी वाहतुकीचे करार करून घेण्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी, उस उत्पादक व तोडणी वाहतुक कंत्राटदारांना अनेक अडचणी आल्या मात्र यापुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची हमी आम्ही देत आहोत. कारखान्याच्या अडचणीच्या काळात कारखान्याप्रती दाखविलेला विश्वास असाच यापुढील काळातही दाखवुन येणारा गळित हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्याचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही संचालक मंडळाचा मानस असून शेतकऱ्यांच्या 

घामाला योग्य दाम देण्यासाठीही आम्ही कटीबध्द राहू. असे सांगून सर्व वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या कारखान्याबरोबर करार करावेत व येणारा गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व वाहन मालक, ऊस तोडणी कंत्राटदार या सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सैारभ शिंदे यांनी केले.

अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे बोलताना म्हणाले, साखर कारखानदारीत ऊस 

वाहतूकदार व ऊस तोडणी यंत्रणा हे दोन घटक महत्वाचे असून हे दोन घटक असल्याशिवाय 

कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नाही, हे सर्वश्रृत असल्याचे त्यांनी सांगून कारखान्याचे आगामी गळीत हंगामाकरीता कारखान्याने ऊस क्षेत्राची नोंद करण्यास सुरूवात केली असून आगामी हंगामात विक्रमी गाळप व अत्युत्तम साखर उतारा काढण्याचा दोन्ही संचालक मंडळाचा मनोदय असून,कारखान्याकडे नोंद केलेला सर्वचा सर्व ऊस सभासदांनी गाळपास पुरवून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यास आवाहन केले. यावेळी सर्व संचालकांसह सभासद, 

वाहतूक संस्था संचालक, शेती अधिकारी, तोडणी वाहतूक मुकादम उपस्थित होते.

फोटो 

  तोडणी वाहतुकीचे करार शुभारंभ करताना प्रतापगड कारखान्याचे  चेअरमन सौरभ  शिंदे, अजिंक्य तारा कारखाण्याचे चेअरमन यशवंत  साळुंखे, नामदेव सावंत, जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे व संचालक मंडळ.( सूर्यकांत जोशी )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular