HomeTop Newsअलीमको कंपनीचे उपक्रम दिव्यांगाना दिलासा देणारे :आ. शिवेंद्रसिंह राजें

अलीमको कंपनीचे उपक्रम दिव्यांगाना दिलासा देणारे :आ. शिवेंद्रसिंह राजें

कुडाळ – समाजात वावरताना दिव्यागांना सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध साधनांचा गरजेनुसार उपयोग व्हावा यासाठी अलिमको संस्थेने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असून याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घ्यावा . असे आवाहन करून अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन संस्थेने पुन्हा करण्याची अपेक्षा आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग,आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO) कानपूर, जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली (मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जावली (मेढा) या ठिकाणी सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना भारत सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी आ .भोसले बोलत होते .
यावेळी जावली महाबळेश्वर बाजार समितीचे संचालक हणमंत शिंगटे ,जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले ,गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ , अलिमको संस्थेच्या ज्युनियर मॅनेजर डॉ.श्रीमती अभिलाषा ढोरे ,डॉ.निरज मोरया , डॉ.सृजन भालेराव ,डॉ. श्रीमती.अंजली तसेच सर्व खाते प्रमुख सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी , ग्रामसेवक दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते .
प्रास्ताविकामध्ये गटविकास अधिकारी मनोज भोसले त्यांनी दिव्यांग बांधवांनी भौतिक प्रगती बरोबर आर्थिक प्रगती सुद्धा करावी तसेच अलिंमको संस्थेने उर्वरित राहिलेल्या दिव्यांग बांधवांकरीता पुन्हा या प्रकारचे शिबिर आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी अलिंमको संस्थेच्या डॉ. श्रीमती डोरे यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली .
प्रतिनिधीक स्वरूपात एक दिव्यांग भगिनी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मार्टफोन, श्रवण यंत्र , तीन चाकी सायकल , बॅटरी ऑटोमॅटिक , बॅटरी तीन चाकी सायकल, व्हील चेअर ,अंध काठी व इतर विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले .आरोग्य सहाय्यक विशाल रेळेकर , यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्यावतीने उपस्थित दिव्यांग बांधवांची स्वच्छता विषयक जनजागृती केली तसेच ग्रामपंचायत विभागाकडील विविध योजनांची माहिती ग्रामसेवक संदीप सावंत यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular