सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र करहर ते आंबेघर दरम्यान असणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. याठिकाणी रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या पुलावरूनच कुडाळ ते पांचगणी दरम्यानची वाहतूक नियमित सुरु असतें. तसेच आषाढी एकादशी दिवशी करहर येथे मोठी यात्रा भरते. येथील विठू माऊलीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात.गेल्या दोन दिवसापासून या विभागात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी ध्यानात घेऊन पुढील संभाव्य धोका व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.
