Thursday, April 9, 2026
HomeTop Newsआजारी वडीलांना जेवन घेवून चाललेल्या" लारा " उर्फ दीपक वर काळाचा घाला.

आजारी वडीलांना जेवन घेवून चाललेल्या” लारा ” उर्फ दीपक वर काळाचा घाला.


कुडाळ –

सातारा येथील शासकिय रुग्णालयामध्ये उपचार घेतअसलेल्या वडीलांना जेवनाचा डबा घेवून चाललेल्या लारा उर्फ दिपक आनंदा कांबळे याचेवर नियतीचा घाला. अपघातामध्ये जागेवरच मृत्यू.

       भणंग ता.जावली येथील माउली मंगल कार्यालया शेजारी टाटापंच फोरव्हीलर व स्कुटी यांच्यामध्ये समोरासमोर धडक होवून या अपघातात स्कुटी चालक ” लारा ” याचा जागीच मृत्यू झाला.
              याबाबत पोलीस सुत्तांकड सुत्रांकडून  मिळालेल्या माहिती नुसार डांगरेघर ता. जावली येथील लारा ऊर्फ दिपक आनंदा कांबळे वय २९ रा. डांगरेघर ता. जावली हा आजारी वडीलांना जेवणाचा डबा घेवून सातारला स्कुटी क्र एम् एच् ११ डी टी ४०१८  वरून चालला होता. दरम्यान भणंग गांवाजवळ टाटापंच एम एच ०८ बी ई ८४२६ या गाडी चे चालक प्रशांत महादेव मोरे वय ३९ रा. कुंभारवाडानगर २ नं . शाळेच्या पाठीमागे ता. खेड जि रत्नागिरी  व  हे साताररून मेढा मार्गे खेडकडे  चालले होते. प्रशांतने भरधाव वेगाने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजी पणाने वाहन चालवून समोरून येणारे दिपक कांबळे ऊर्फ लारा यांच्या स्कुटीला समोरासमोर धडक दिली. या अपघातामध्ये दिपक ( लारा ) चा जागीच मृत्यू झाला.. सदरची घटना आज दि ८ एप्रिल रोजी दुपारी १२.५ ० च्या सुमारास घडली.

             या घटनेबाबत दिपकचा भाऊ संदिप आनंदा कांबळे रा डांगरेघर यांने मेढा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून घटनास्थळाचा पंचनामा करून प्रशांत मोरे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       या घटनेचा तपास सपोनि सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री.गंगावणे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page