
सूर्यकांत जोशी कुडाळ –
भाद्रपद शुद्ध पक्षातील इंदिरा एकादशी ही पितृपक्षातील एक अत्यंत महत्त्वाची व्रत-एकादशी मानली जाते. याला पितृमोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी उपवास, जप, दान केल्यास पितृऋणातून मुक्ती मिळते आणि पितरांना स्वर्गगमनाचा मार्ग सुलभ होतो असे शास्त्र सांगते.
महात्म्य व महत्व :
1. पितृमोक्ष – या एकादशीच्या व्रताने पितरांची आत्मा तृप्त होऊन त्यांना स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त होतो.
2. विष्णुभक्ती – या दिवशी भगवान श्रीविष्णूची उपासना केल्याने पापक्षय होतो आणि पुण्यवृद्धी होते.
3. पितृपक्षातील विशेष स्थान – पितृपक्षात सगळ्या तिथी पितरांसाठी मानल्या जातात. परंतु इंदिरा एकादशीला केलेले व्रत आणि दान हे विशेष फलदायी ठरते.
4. कथा – पुराणात उल्लेख आहे की सत्ययुगात राजा इंद्रसेन याने हे व्रत करून आपल्या पित्यास नरकातून मुक्त केले. त्यामुळं याला इंदिरा एकादशी असे नाव पडले.
व्रतविधी :
या दिवशी उपवास, जागरण, विष्णु पूजन व विष्णुसहस्रनाम पठण करावे.
पितरांना पाणी, तर्पण अर्पण करावे.
भोजन व दान दिल्यास पितर प्रसन्न होतात.
दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडावा.
फल :
उपासकाचे सर्व पाप धुतले जातात.
पितरांना मोक्ष प्राप्त होतो.
कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य व समाधान लाभते.
त्यामुळे इंदिरा एकादशी ही पितृमोक्षदायिनी एकादशी म्हणून सर्वच एकादशींपैकी अत्यंत पुण्यदायी मानली जाते.
