Monday, April 6, 2026
HomeTop Newsआज कोणती गावे आहेत कोरोनाच्या रडारवर.

आज कोणती गावे आहेत कोरोनाच्या रडारवर.

जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ ;

कुडाळ दि. ३०. – जावली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना वाढ नियंत्रणात होती.परंतू अन् लाॅक मधील बेजबाबदार पणामुळे पुन्हा एकदा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढ होताना दिसत आहे.कुडाळचे इंदिरा नगर व सोनगाव मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जास्त संख्येने आढळत आहेत.

       जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२८  रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२९ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तालुक्यात आज पर्यंत २२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तालुक्यात २०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

         आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे केळघर तर्फे सोळशी ३,सावरी १,मेढा १,महू २,रुईघर १,हुमगांव १,कुडाळ १३,आनेवाडी ३, धोंडेवाडी १,रायगांव १,सायगांव १, सोनगाव १२, एकूण ३५.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page