जावलीत कोरोनाचा पुन्हा फुत्कार; आज दोघांचा कोरोना मुळे मृत्यू ; ५४ जण पाँझिटीव्ह ;
एकूण – १६७१ , डिस्चार्ज १२४५, बळी ४७ ,अँक्टिव्ह ३८३
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज आलेवाडी येथील ८० वर्षीय महिलेचा तसेच निझरे येथील ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज ५४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. यामध्ये दिवदेववाडी 1,सांगवी मेढा 3,बेलवडे 2,सोमर्डी 2,आलेवाडी 3,सोनगाव 2,कुडाळ 8 ,बामणोली तर्फ कुडाळ 4,रिटकवली 2,आणेवाडी 1,सायगाव 1,जवळवाडी 4,बीभवी 6,आंबेघर मेढा 1,वरोशी 3,ओझरे 5,पवारवाडी 1,करंजे 3,मेढा 1,नांदगणे 1 ,भणंग 1 यांचा समावेश आहे.
जावलीत कोरोनाचा पुन्हा वेग वाढला
गेले चार दिवस जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा वेग थोडा मंदावला होता परंतू आज पुन्हा कोरोनाने जोरदार फुत्स्कार सोडला आहे. लोकांनी स्वतः ची व आपल्या कुटुंबाची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ही नोंदणी कृत आकडेवारी आहे.परंतु अनेक जण खाजगी रुग्णालयात बिनबोभाट उपचार घेत असल्याचीही चर्चा आहे.
कोरोनाची कोणतीही लक्षणे असलेला रुग्ण आल्यास प्रशासनाला तातडीने कळविण्या बाबतच्या सूचना खाजगी रुग्णालये तसेच औषध दुकानदार यांना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत असे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले आहे.
मेढा २७५/२ कुडाळ १०५/४
जावली तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या असणाऱ्या मेढा शहरात एकूण कोरोना बाधितांचा आकडा २७५ वर पोहचला आहे. तर कुडाळचे कोरोना बाधितांचे शतक आज पूर्ण झाले असून एकूण आकडा १०५ वर पोहचला आहे. परंतू आता दोन्ही बाजार पेठांत व्यापारी आणि ग्राहक विषेश काळजीपूर्वक व्यवहार करत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.