Saturday, April 11, 2026
HomeTop News"आ.शशिकांत शिंदे साहेब जरा जावलीतील जनतेलाही आधार द्या. "

“आ.शशिकांत शिंदे साहेब जरा जावलीतील जनतेलाही आधार द्या. “


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील जनता आता पुरेशा आरोग्य सुविधे अभावी तडफडत आहे.अनेकांना बेड न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत.आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजें भोसले तसेच अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी आपले योगदान देत आहे . प्रशासन असणाऱ्या यंत्रणेच्या सहााय्याने जोरदार लढा देत आहे. पण साहेब तुम्ही तर आमच्या जीवाभावाचे आहात. पण या संकटात आपण आमच्या सोबत दिसत नाही याची खंत वाटत असल्याची भावना जावलीतील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.काही द्या देऊ नका पण जिल्हयातील आरोग्य विभागातील रीक्त पदे तरी तातडीने भरुन मनुष्यबळ उभे करा.
साहेब जगाच्या पाठीवर आपण कोठेही असलात तरीही आम्हा जावली करांना आपल्या प्रगतीचा अभिमान वाटतो.जावली मतदार संघातील आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक जावली करांच्या काळजात आपण निर्माण केलेले स्थान आजही अबाधित आहे.
मतदार संघाच्या बदला नंतर आपणाला कोरेगाव मतदार संघात यश मिळावे यासाठीही जावली करांनी योगदान दिले. तर आपणास मंत्रीपद मिळावे यासाठी आपल्यावर प्रेम करणार्या जावलीकरांनी महामार्गावर रास्ता रोको केला.आता विधान परिषदेवर आपली निवड झाल्या नंतर जावलीतील जनतेला आपल्या कडुन पुन्हा अपेक्षा वाटत आहेत.
आपण मनात आणले तर तालुक्यात मोठे कोविड हाँस्पिटल उभारण्याची आपल्यामध्ये धमक असल्याचा आम्हाला विश्वास आहे. तालुक्याची भौगोलिक अडचण आपण शासन स्तरावर मांडून ही व्यवस्था शासनाकडून निर्माण करु शकता.याच भौगोलिक अडचणी मांडून आपण आपल्या मेढ्याचा काँलेजला अनुदानित मान्यता मिळवली आहे. त्यायाचा लाभ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना हो आहे . तशीच हीच खासबाब म्हणून तालुक्यासाठी एक सुसज्ज कोविड हाँँस्पीटल आपण निर्माण करु शकला असता.पण गेल्या सहा महिन्यात साहेब जावलीतील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही दिलासा। आपणाकडुुन मिळाला नाही.
आज आपला पक्ष सत्तेत आहे. आणि आपण या पक्षातील लोकप्रिय आणि वरीष्ठ नेते आहात म्हणूनच अपेक्षा आहे. तालुक्यातील डोंगर दर्यातील लोकांना बेड मिळवण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा जवळपास आता पन्नास च्या घरात आला आहे. आता यामहिन्यात दररोज एकदोन बळी जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते दानशुर लोक स्वतः हुन प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. पण साहेब आपण कुठेच दिसत नाही. आपल्या काही कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात मास्क सँनिटायझर वाटले.आता ते कालबाह्य झाले. आता हे संकट तुमच्या प्रेमळ जावली करांच्या जीवावर उठलय आतातरी काही करा.आपण आपल्या अनेक भाषणात भूमीपुत्राच्या नात्याने जावली करांना मायेची साद घालता .तीच साद आता ऐकण्यासाठी साठी जावलीची जनता आतुर झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page