Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsकळंभे–सर्जापूर मार्गावरील वाहतूक २० दिवस बंद; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन:निरंजना नदीवरील...

कळंभे–सर्जापूर मार्गावरील वाहतूक २० दिवस बंद; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन:निरंजना नदीवरील पुलाच्या काँक्रीटीकरणास उद्या सुरुवात


सूर्यकांत जोशी कुडाळ  :
कळंभे (ता. वाई) व सर्जापूर (ता. जावली) या दोन्ही गावांच्या हद्दीवरील निरंजना नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पूल वाहतुकीस जोखमीचा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर पुलावरील बुजवणे व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे.
जननायक आमदार व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील तसेच पंचायत समिती वाई यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध झाल्याने उद्या शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सदर कामाचा शुभारंभ होणार आहे.
कामकाजाच्या कालावधीत पुढील २० दिवसांसाठी कळंभे–सर्जापूर हद्दीतील पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील वाहनधारक व नागरिकांनी विरमाडे–कळंभे तसेच कळंभे–गणपतीचा माळ वाहतूक  पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.लहान व छोट्या वाहनांसाठी नदीपात्रातून प्रवास फक्त नदीला पाणी कमी असताना करण्याची मुभा देण्यात येणार असून, नागरिकांनी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
— ग्रामपंचायत कळंभे, ता. वाई, जि. सातारा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page