सूर्यकांत जोशी कुडाळ – वडील आणि मोठा भाऊ पोलीस दलात होते.त्यामुळे पोलिसांबाबत मनामध्ये नेहमीच जिव्हाळ्याची भावना असते.उन वारा पाऊस यांची त्या न बाळगता पोलीस कर्तव्य बजावत असतात.सध्या पावसाळा सुरू आहे.पावसात भिजत नाकाबंदी करत असताना पोलिसांना पाहिले आणि पोलीसांना पावसापासून संरक्षण व्हावे या भावनेतून पोलीसांना छत्री वाटप केले आहे.असे प्रतिपादन कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी केले.
कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही.त्यामागे त्यांची असणारी तळमळ व भावना लाखमोलाची आहे.त्यांनी पोलिसां प्रती दाखवलेला प्रेम व जिव्हाळा पोलीसांना प्रेरणादायी आहे .असे कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय महेश कदम यांनी सांगून आभार मानले.
यावेळी उपसरपंच सोमनाथ कदम, प्रवीण मोरे, सचिन वारागडे, समीर डांगे, विजय चिकणे, रणजित कदम.तसेच पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
