HomeTop Newsकुडाळच्या गजराज मंडळाचा देशभक्तीपर देखावा लक्षवेधी :

कुडाळच्या गजराज मंडळाचा देशभक्तीपर देखावा लक्षवेधी :

कुडाळ येथील गणेशोत्सव मंडळाच्या उत्साहाला उधाण :

सूर्यकांत जोशी  कुडाळ – यावर्षी कोरोना निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.येथील गजराज  मित्र मंडळाने आपली वैविध्यपूर्ण देखाव्यांची परंपरा राखत सादर केलेल्या ‘मी पंधरा  ऑगस्ट बोलतोय ‘ हा देश भक्ती पर जीवंत देखावा  पाहण्यासाठी कुडाळ पांचक्रोशीतील भाविकांची  मोठी  गर्दी होत आहे.याबरोबरच अन्य मंडळे सुद्धा आपले सामाजिक उपक्रम राबवत आहेत.आता गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला मंडळाचे कार्यकर्ते लागले आहेत.

              देव देश आणि धर्मासाठी… हे ब्रीद वाक्य घेऊन  अडतीस वर्षा  पूर्वी कुडाळ येथे  गजराज  मित्र मंडळाची  स्थापना झाली. मंडळाच्या  वतीने गेले 38 वर्ष  कुडाळ नगरीमध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम , सार्वजनिक गणेशोत्सव व माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात आनंदात आणि सर्वांना समवेत घेऊन मंडळ साजरी करत आहे.

            यावर्षी *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष* लक्षात घेता मंडळाने 22 लहान मोठ्या जिवंत कलाकाराचा एक आगळावेगळा कलाविष्कार सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे . देखाव्याचे नाव 

*मी 15 ऑगस्ट बोलतोय*असे आहे.

          या देखाव्याच्या माध्यमातून आपल्या देशाविषयी आपले असणारे प्रेम ,भावना व्यक्त करतानाच भविष्यामध्ये आपणाला जागतिक महासत्ता तसेच अधिक सुदृढ व सक्षम होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील , त्याचबरोबर आपल्या युवा पिढीला योग्य मार्ग दाखवून जागरूक नागरिक कसे करता येईल यासंदर्भात सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे .

 भावी पिढीला प्रेरणादायी असा देखावा – महेश पवार.

         गेले अडतीस  वर्ष  मंडळाच्या  वतीने  विविध  सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोणताही उपक्रम हाती घेतल्या नंतर तो पूर्णत्वास नेहाण्यासाठी मंडळाचे  कार्यकर्ते जीवाचे  रान करतात. हे सर्व  मंडळाच्या  सांघिक प्रयत्नामुळेच शक्य होते. तसेच मंडळाच्या समाजाभीमुख सर्वच  उपापकामांना ग्रामस्थांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभते. या वर्षी  सादर केलेला देखावा  स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सव साजरा  करत  असताना  भावी  पिढीला दिशा  देणारा आहे. अशी  प्रतिक्रिया मंडळाचे  प्रमुख  सदस्य  व सामाजिक कार्यकर्ते महेश पवार  यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular