Friday, April 3, 2026
HomeTop Newsकुडाळच्या पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात  ढोल-लेझीम प्रशिक्षणाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: अविनाश गोंधळी तथा...

कुडाळच्या पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात  ढोल-लेझीम प्रशिक्षणाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
अविनाश गोंधळी तथा बापू सर यांचा युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम


कुडाळ (प्रतिनिधी):
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या युवा पिढीला पारंपारिक कलेची ओळख करून देत त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक असणारे कराटे प्रशिक्षक अविनाश गोंधळी तथा बापू सर कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात युवकांना ढोल लेझीम शिकवत आहेत.
    श्री पिंपळेश्वर-वाकडेश्वर मंदिर परिसरात सध्या रात्री नऊ नंतर ढोल-लेझीम च्या आवाजाकडे युवा वर्गाचे पाय आपोआप वळू लागले आहेत. या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ढोल-लेझीम हा केवळ एक खेळ किंवा कला प्रकार नसून तो शारीरिक व्यायाम, सांस्कृतिक जतन आणि सामूहिक आनंद यांचा उत्कृष्ट संगम आहे.
       ढोलाच्या तालावर आणि लेझीमच्या लयीत होणारे सादरीकरण शरीराला सुदृढ बनवते.नियमित सरावामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते.समूहात काम करण्याची सवय आणि शिस्त विकसित होते.पारंपारिक संस्कृतीशी नाते दृढ होते.यामुळे युवकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे.
          आजची तरुण पिढी मोबाईल आणि इंटरनेटमध्ये जास्त वेळ घालवत असल्याने शारीरिक हालचाल कमी होत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत ढोल-लेझीमसारखे पारंपारिक आणि ऊर्जादायी उपक्रम युवकांना मोबाईल व टीव्ही स्क्रीनपासून दूर ठेवतात.
मैदानी खेळांकडे आकर्षित करतात.मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात.हा उपक्रम म्हणजे आधुनिक समस्यांवर पारंपारिक उत्तर ठरत आहे.
या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत असलेले युवक केवळ कला शिकत नाहीत, तर आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारत आहेत.सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहेत.स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करत आहेत.या उपक्रमाचा युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पारंपारिक कलेचा वारसा पुढे नेण्यास हातभार लावावा हाच उद्देश अविनाश गोंधळी तथा बापू सरांना अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page