Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळच्या शेतकरी मेळाव्यात आ.शिवेंद्रसिंहराजेंची चौफेर फटके बाजी ;

कुडाळच्या शेतकरी मेळाव्यात आ.शिवेंद्रसिंहराजेंची चौफेर फटके बाजी ;

पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण खपवून घेणार नाही .सूप्त इशारा.

आ.शशिकांत शिंदे यांच्या वरही शरसंधान

 सूर्यकांत जोशी कुडाळ -गेल्या दहा वर्षांत ऊस नेहला जात नाही यासाठी शेतकरी मेळावा लावण्याची वेळ का आली याचा विचार करावा. पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण आम्ही कधीच करत नाही. मग झाल गेले विसरून जाऊन सहकार्य करण्याची अपेक्षा का करावी.निवडणुकीत विरोधकांच्या मांडिला माडी लावणारांनी याचा विचार करावा. पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण कदापी खपवून घेणार नाही असा खणखणीत इशारा आ.शिवेंद्रसिंहराजेंनी निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांना दिला.असे असले तरीही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आजही तालुक्यात अजिंक्य तारा कारखान्याच्या चाळीस टोळ्या कार्यरत आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस नेहण्याचा प्रयत्न केला जाईल. असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती आ.शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी केले.

         कुडाळ ता. जावली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,उपसभापती सौरभ शिंदे,माजी सभापती मोहनराव शिंदे,सौ.अरुणा शिर्के, माजी उपसभापती रविंद्र परामणे,हणमंतराव पार्टे,  मालोजीराव शिंदे,हिंदुराव तरडे, श्रीहरी गोळे,चंद्रकांत तरडे,वीरेंद्र शिंदे,प्रशांत तरडे, प्रदीप तरडे,शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख कमलाकर भोसले उपस्थित होते.

आ.शशिकांत शिंदे यांनी पराभवाचे खापर आपल्यावर फोडू नये

        आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी यावेळी गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकारणाचा चौफेर समाचार घेतला.आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव आपल्या मुळे झाल्याची चर्चा होत असल्याचे समजते.परंतू आमदार शशिकांत शिंदे साहेबांना पाडण्यासाठी आपण कोणताही प्रयत्न केला नाही.ते विरोधी पक्षांत असले तरीही त्याच पक्षाचे अन्य आमदार मी विरोधात काम केल्याचे म्हणत नाहीत. आ.शशिकांत शिंदे याबाबत व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया चूकीची आहे. त्यांना पाडायचेच असते तर पहिल्या निवडणुकीत च पाडले असते. त्यांच्या पराभवाचे खापर आपल्यावर फोडू नये.आपण जे काय करायचे ते समोरा समोर करतो.कोणाच्या पाठीत खंजीर खूपसत नाही. आपला कोणी काटा काढणार असेल तर आपणही काट्याने काटा काढण्यात कमी पडत नाही असा सूप्त इशारा आ.शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.

     आ.शिवेंद्रसिंहराजें म्हणाले, सुहास गिरी व जयश्री गिरींना शब्द दिला होता म्हणून पंचायत समितीची उमेदवारी दिली. आता ते का लांब गेले मला माहिती नाही. आणि त्यांना  विचारणारही नाही. मी आमदार असेन अथवा नसेन पण छत्रपती म्हणून कायम राहीन.दिलेला शब्द छाती ठोक पणे सांभाळण्याची शिकवण आमच्या वडिलांनी दिली आहे. आपण प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होतो.सर्वांचे फोन घेतो.शक्य ती मदत करत असतो.ज्याची ताकद आहे. त्यालाच राजकीय वजन असते.आपल्या सभ्य पणाचा गैरफायदा घेत आहेत. 

प्रतापगड कारखाना सुरू करण्यासाठी सौरभ शिंदे यांना पूर्ण सहकार्य

        प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन.हा कारखाना सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, कोणाकडे जावे लागेल ते आपणास ठाऊक आहे. यावर्षी जावलीतील शक्य तितका ऊस अजिंक्य तारा कारखाना नेहण्याचा प्रयत्न करणार. परंतु कारखान्याच्या सभासदांच्या उसाला प्राथान्य राहील.मीही माणूस असून मलाही भावना आहेत. जर आपल्याला कोणी आडवे येत असेल तर त्याला आडवे करण्याची आपल्यात ताकद आहे असा इशारा आ.शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.

        वसंतराव मानकुमरे म्हणाले, कोरोनाचे भयावह रूप आपण पाहिले.संपर्क तुटला होता.त्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देढालाही धक्का लागला नाही पाहिजे अशी शिकवन दिली. त्या प्रमाणेच जावलीतील शेतकऱ्यांचे ऊसाचे नुकसान होणार नाही याची काळजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी घ्यावी.जावली तालुक्यात आता फक्त बाबांच्याच कारखान्याच्या टोळ्या राहतील.

         शेतकरी मेळाव्यात पंचायत समितीचे सभापती पद बदलाचे वसंतराव मानकुमरे यांचे संकेत.विद्यमान सभापती जयश्री गिरी यांना हटवण्याची मानकुमरे यांनी जोरदार मागणी केली.

        सौरभ शिंदे म्हणाले, ज्या हेतूने लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी उभा केला त्याचे महत्त्व आज समजत आहे. कारखाना चालावा म्हणून किसनवीर कारखान्याला चालविण्यासाठी दिला पण पाच वर्षांत तीन वर्षे कारखाना बंद राहीला. कामगारांचे पगार थकले आहेत. ते न दिल्याने प्रतापगड कारखाना बंद. प्रतापगड कारखाना सुरळीत सुरू होण्यासाठी हा करार रद्द होणे आवश्यक आहे .त्यासाठी प्रतापगड कारखाना संचालक मंडळ न्यायालयात गेले आहे. लवकरच हा कारखाना ताब्यात घेऊन पुढील वर्षी कारखाना गाळप सुरू करेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

        प्रतापगड कारखान्याचे महत्व अधोरेखित

     आपल्या भाषणात अनेक वक्त्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येत असल्याचे गार्हाणे गात होते. परंतू प्रतापगड कारखाना उभारणी पासून अडचणी निर्माण करणारे तसेच ज्यावेळी प्रतापगड कारखाना सुरु होता त्यावेळी या कारखान्याला जावलीतील शेतकरी लागणीचा उस इतर कारखान्याला देत होते तर खोडवा व निडवा प्रतापगड कारखान्याला देत होते. आज ज्यावेळी ऊसा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी प्रतापगड कारखान्याचे महत्व समजत आहे. असे सौरभ शिंदे यावेळी म्हणाले.

         .यावेळी बापूराव गायकवाड,संदीप परामणे,प्रकाश परामणे,रविंद्र परामणे शेतकरी संघटनेचे नेते कमलाकर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

       प्रास्ताविक जावली बँकेचे संचालक शिवाजीराव नवसरे,स्वागत जयदीप शिंदे यांनी केले.शरद रांजणे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page