कुडाळ – पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यांच्यावतीने कुडाळ तालुका जावली येथील सौ तनुजा साहिल जंगम यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सौ तनुजा त्यांच्या या अभूतपूर्व यशाने कुडाळ गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सौ.जंगम यांना ऑसीमम सॅक्टम स्टडी ऑफ अल्कलाइडस या
विषयावरील संशोधनावर ही पदवी प्रदान करण्यात आली.त्यांना मुंबई विद्यापीठाचे एम एस स्सी, बायो केमिस्ट्री या विषयात सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांना जेष्ठ संशोधक डॉ. अशोक गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी कुडाळ येथील मनीषा सोपानराव बोराटे, सोनल शरद बावकर व शर्मिला शरद मोरे या तिघीनी विविध विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.या तिघींसह सौ. तनुजा जंगम यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशा बद्दल सौ तनुजा जंगम यांचे खा. श्री. छ.उदयनराजे भोसले, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंह राजें भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी अभिनंदन केले.