कुडाळला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी नियोजन बद्ध विकास कामे कररणार – सौरभ शिंदे

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुडाळला नियोजन बद्ध विकासकामांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात स्मार्ट सिटी करणार असल्याचे प्रतिपादन जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभबाबा शिंदे यांनी केले .
कुडाळ ग्रामपंचायतीची सत्ता हातात येताच सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्या विकास पर्वाची सुरुवात कुडाळ येथे सुरू झाली आहे.सौरभ शिंदे यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून जास्तीत जास्त निधी कुडाळच्या विकासासाठी आणतील असा विश्वास बाजारसमितीचे संचालक राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.
कुडाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपसभापती सौरभ {बाबा} शिंदे यांच्या प्रयत्नातुन पवार आळी रस्ता ,नागोबाचा माळ रस्ता ,प्राथमिक शाळा कुडाळ शौच्छालय इत्यादी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी उपसभापती सौरभ शिंदे बोलत होते.यावेळी प्रतापगड साखर कारखाना संचालक मालोजीराव शिंदे,जितेंद्र शिंदे,जावली बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम,उत्तम पवार , सरपंच सौ. सुरेखा कुंभार ,धैर्यशील शिंदे, दिलीप वारागडे, अनिल किर्वे, राहुल ननावरे, आशिष रासकर, महादेव शिंदे ,सचिन मदने, निलेश पवार, उपस्थित होते.