सूर्यकांत जोशी कुडाळ दि.२९ – कुडाळ परिसरात आज दुपारी तीन वाजल्यापासून वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाट होत आहे.यावर्षभरातील हा जोरदार पाऊस असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहेत.या पावसामुळे हवेत गारवा आल्याने लोकांची उकाड्यापासून सुटका झाली.हा पाऊस खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.