सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या कुडाळ बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे, चिखल माती, त्याच बरोबर मच्छर, माशांचा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत अशा अवस्थेत एस टी बसची तासंतास वाट बघताना शालेय विद्यार्थी आणि अबाल वृद्धांचे अक्षरशः हाल होत आहेत. संबंधित जबाबदार विभाग व लोकप्रतिनिधिनी तातडीने लक्ष घालून बस स्थानक सुशोभित व सुविधापूर्ण करावे अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
कुडाळ हे बाजारपेठेचे गाव असल्याने परिसतील गावचे लोक खरेदी साठी येत असतात. यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होत असतें. यातूनच गावाचा विकास होत असतो. प्रवाशांना योग्य सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी जबाबदार असणारांनी तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केली आहे.
