कुडाळ ता जावली येथे प्राथमिक शाळेलगत पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या*
सदर विक्रेता भर लोकवस्तीतील राहत्या घरात च्या शेड मधून छुपी दारू विक्री करत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली .त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पवनकुमार रामचंद्र वारागडे राहणार कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा हा देशी-विदेशी दारूची विक्री करीत असताना दारूचा मुद्देमाल व मोटरसायकल असा एकूण 56240/- रूपयांचा मुद्देमालासह मिळून आला असून त्याच्यावर मेढापोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई साठी सपोनि संतोष तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा.डी.जी.शिंदे,पो.कॅा. सनी काळे,दिगंबर माने , पो.हवा.डी.जी.शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
केवळ वरून दबाव आहे म्हणून अशा चिरिमिरी कारवाईचा दिखावा न करता पोलिसांनी
या कारवाया संबंधितांचे मूळ उखडेपर्यंत सुरु ठेवणे गरजेचे आहे. येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबवावी. त्यानंतर गनिमी काव्याने जनताच या अवैध व्यवसाना चव्हाट्यावर आणेल असा इशारा व्यसनमुक्ती युवक संघांचे राज्यध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.