कुडाळ – रात्रीच्या वेळी दारात उभ्या असणाऱ्या दुचाकीमधून पेट्रोल चोरी करण्याच्या घटना कुडाळ येथे दररोज घडत आहेत. किरकोळ बाब म्हणून कोणी पोलिसात तक्रार देण्याची तसदी घेत नाही. परंतु अशा छोटया घटना या उद्याच्या मोठया धोक्याची घंटा असू शकते.सध्या पोलिसांची रात्र गस्त दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.