HomeTop Newsकुडाळ येथे लाँकडावुन ची काटेकोर अंमलबजावणी

कुडाळ येथे लाँकडावुन ची काटेकोर अंमलबजावणी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात वहातुक नियंत्रण व ग्राहकांना मार्गदर्शन करताना स्वयंसेवक व दक्षता समिती कार्यकर्ते

कुडाळ-कोरोनाला रोखण्यासाठी कुडाळ येथे लाँकडावुन ची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारात होणारी लोकांची गर्दी टाळण्यासाठी गावातील दक्षता समितीने पुढाकार घेऊन नियोजन केले आहे. यावेळी सरपंच वीरेंद्र शिंदे व उपसरपंच गणपत कुंभार स्वतः उपस्थित राहुन मार्गदर्शन करत होते.

       गेले तीन दिवस कुडाळ ग्रामस्थ व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवली होती. आज सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ किराणा आणि भाजीपाला बाजार कुडाळच्या लोकांसाठी सुरू ठेवण्यात आला होता.यावेळेत कुडाळच्या ग्राहकांनी आवश्यक खरेदी केली.

          कोरोना संसर्गाची शक्यता बाहेरच्या बाधित क्षेत्रातील येणाऱ्या लोकांच्या पासून अधिक आहे. त्यामुळे गावात येणारे सर्व रस्ते रहदारीस बंद करण्यात आले असून केवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील रस्ता रहदारीस खुला आहे. या चौकातही कार्यकर्ते व पोलीस गावात येणारांची कसून चौकशी करत आहेत. व अत्यावश्यक सेवेची गरज असणाऱ्याला गावात प्रवेश दिला जात आहे.दक्षता समितीच्या निर्णयानुसार मंगळवारी बाजारपेठ दवाखाना, मेडिकल व बँक वगळता पूर्ण बंद राहणार आहे. 

           बुधवारी परिसरातील गावच्या छोट्या मोठ्या दुकानदार व व्यापाऱ्यांनी माल खरेदी साठी प्रवेश दिला जाणार आहे.त्यासाठी संबंधितानी आपल्या गावातील सरपंचांचे संमती पत्र आणणे आवश्यक आहे.कुडाळ बाजार पेठेतील गर्दी टाळण्यासाठी किरकोळ ग्राहकांनी आपल्या गावातील दुकानातूनच माल खरेदी करण्याचे आवाहन कुडाळच्या दक्षता समितीने केले आहे.गुरुवार पासुन तीन तारखे पर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे. असा निर्णय केवळ सर्व ग्रामस्थांच्या आरोग्य रक्षणासाठी घेण्यात आला आहे.असे दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular