Sunday, April 5, 2026
HomeTop Newsकुडाळ येथे सोमवारी शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक

कुडाळ येथे सोमवारी शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक

 सूर्यकांत जोशी कुडाळ -ऊस उत्पादकां वर होणाऱ्या अन्याया विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची महत्वाची बैठक, सोमवारी दुपारी एक वाजता कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती शेतकरी संघटना प,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा  संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष  कमलाकर नाना भोसले यांनी दिली आहे.

          ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे अद्यापी ऊस बिल मिळाले नाही, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, महावितरणने शेतकऱ्यांना बोगस बिले देऊन शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, जिल्ह्यातील खाजगी सावकारी व विकास सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जाची चाललेली जप्ती वसुली थांबवण्यासाठी तसेच, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सहाय्यकाचा आओ जाओ घर तुम्हारा मनमानी कारभार व दूधाच्या, दरवाढीसाठी व लबाड व्यापाऱ्यांची कमी दराने सोयाबीन खरेदी, अशा शेतकऱ्यांच्या अनेक समस्यां विषयी चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे .

        या बैठकीसाठी सर्व शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे .बैठक नियोजित वेळेतच सुरू होईल तसेच   सर्व शेतकऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक सर्वं नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.असे आवाहन  कमलाकर नाना भोसले यांनी केले आहे,

          या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटना  प, महाराष्ट्र महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्षा सीमाताई नरोडे,  प,महाराष्ट्र शेतकरी संघटना युवा आघाडी  अध्यक्ष, सुनील गोटकिले,  शेतकरी संघटना प, महाराष्ट् विभाग प्रमुख अशोकराव जाधव उपस्थित राहणार आहेत,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page