कुडाळ – येथील कै. लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पटसंस्थेचे चेअरमन सौरभ शिंदे होते.
यावेळी सौरभ शिंदे म्हणाले,कै.लालसिंगराव शिंदे काका व कै.राजेंद्र शिंदे भैय्या यांना आपण सर्वांनी दिलेल्या विश्वास पूर्ण सहकार्याच्या जोरावर संस्थेची गेली 34वर्षे यशस्वी घोडदौड सुरु आहे.आजही तोच विश्वास माझ्या पाठीशी कायम ठेवला आहे तो असाच वृद्धिंगत राहावा. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने सुरु होत आहे. कारखाना स्थळावर पतसंस्थेची शाखा सुरु करण्यात येणार आहे.
सभेला पंचायत समितीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे,प्रतापगड कारखाना संचालक राजेंद्र फरांदे चंद्रकांत तरडे इनामदार, वसंतराव तरडे , पतसंस्थेचे संचालक रमेश फरांदे, मोहन देशपांडे, अंकुश शिवणकर, सर्जेराव कांबळे, देविदास शेवते, राहुल बावकर, विठ्ठल मोरे व मान्यवर उपस्थित होते. अहवाल वाचन संस्थेचे उप व्यवस्थापक प्रकाश शिवणकर यांनी केले. स्वागत व्यवस्थापक अशोक साबळे यांनी केले.प्रास्ताविक संचालक विठ्ठल मोरे यांनी केले. रमेश फरांदे यांनी आभार मानले.
