Homeराजकीयकै. लालसिंगराव शिंदे  सह. पतसंस्थेच्या  चेअरमन पदी  अंकिता शिंदे व्हा. चेअरमन पदी ...

कै. लालसिंगराव शिंदे  सह. पतसंस्थेच्या  चेअरमन पदी  अंकिता शिंदे व्हा. चेअरमन पदी  रमेश  फरांदे  पाटील

सूर्यकांत जोशी  कुडाळ – जावली  तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कै. लालसिंगराव बापूंसो. शिंदे  सहकारी  पतसंस्थेच्या  चेअरमन पदी  सौ. अंकिता सौरभ  शिंदे यांची  व व्हाईस चेअरमन पदी  रमेश  दत्तात्रय फरांदे  पाटील यांची  बिनविरोध निवड  करण्यात आली.

               पतसंस्थेची  पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज चेअरमन व व्हा. चेअरमन निवडी  साठी  संचालक मंडळाची  विशेष सभा  बोलावण्यात आली होती. चेअरमन पदासाठी  अंकिता सौरभ  शिंदे  व व्हा चेअरमन पदासाठी  रमेश दत्तात्रय फरांदे  यांचे  प्रत्येकी एक अर्ज दाखल  झाल्याने अध्याशी अधिकारी तथा  सहा. निबंधक सहकारी  संस्था  देशमुख  यांनी सौ. शिंदे  व फरांदे  यांची  बिनविरोध निवड  झाल्याचे जाहीर केले.

       यावेळी प्रतापगड सहकारी  साखर  कारखान्याचे चेअरमन व पतसंस्थेचे  विद्यमान संचालक सौरभ राजेंद्र शिंदे, रघुनाथ जगन्नाथ तरडे, श्रीरंग  पांडुरंग पंडित, कांताराम आण्णा ससाणे, नितीन बबन  दुदुस्कर, रवींद्र प्रल्हाद निकम, विकास ज्ञानेश्वर जाधव, लीलावती  दिलीप पवार, अशोक  तात्याबा रासकर, जितेंद्र साहेबराव खरात, राहुल विठ्ठल बावकर तसेच  कारखान्याचे  संचालक दादा पाटील, विजय  शेवते, विठ्ठल मोरे, वसंतराव तरडे उपस्थित होते.पतसंस्थेचे  सहा. व्यवस्थापक  प्रकाश शिवणकर  यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन रमेश फरांदे  यांनी आभार  मानले.

 पतसंस्थेच्या  प्रगतीसाठी प्रयत्न करणार  – अंकिता शिंदे

          पतसंस्थेचे  दीपस्तंभ असलेल्या स्व. काका व भैय्यासाहेब यांचा  आदर्श  डोळ्यापुढे ठेऊन कार्यरत  राहणार. तसेंच पतसंस्थेची  आर्थिक उलाढाल  वाढण्यासाठी व  जिल्हा कार्यक्षेत्र होण्यासाठी संचालक मंडळाच्या  सहकार्याने   नियोजन  पूर्वक प्रयत्न करण्यात येतील.असे प्रतिपादन चेअरमन सौ. अंकिता शिंदे  यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular