सूर्यकांत जोशी – जावळी तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विविध दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जावली तालुक्यातील जनतेने वज्रमूठ आवळली आहे.
जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी एक्स रे मशीन देवून मेढा ग्रामीण रुग्णालयातील डीसीएसी सेंटर चे नुकतेच उद्घाटन केले.ही सुविधा जावलीतील कोरोना बाधितांना दिलासा देणारी आहे.
जेमतेम १५ दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शेलार यांनी जावली तालुक्यातील दानशूर व्यक्तींना व्हॉट्स अप ग्रुप करून एकत्र आणून जावली तालुक्यातील कोरोना पेशंट साठी मदत करण्याचे आव्हान केले होते.जावली कोविड इमर्जन्सी ग्रुपच्या पुढाकारामुऴे मेढा ग्रामीण रुग्णालयाला रुग्णालयातील कोरोना पेशंटचे कपडे व बेडशीट धुवायला माणूस मिळत नसल्याची अडचण लक्षात घेऊन मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी श्री.आर के धनावडे साहेब यांनी जंबो वॉशिंग मशिन दिली.जावली कोविड इम्रजन्सी ग्रुप मार्फत गरम पाण्याचा फिल्टर व एक अक्सिजन मशीन, देण्यात आले. तसेच आखाडे गावच्या सरपंच सौ सरिता ज्ञानेश्वर शेलार यांच्या कडून आर ओ प्युरिफायर देण्यात आला.
आखाडे येथील मुबई स्थित उद्योजक सचिन व संदीप शिंदे बंधू नेहमी आखाडे व मुबई येथे जय भवानी प्रतिष्ठान चे माध्यमाद्वारे सामाजिक कार्य करीत असतात.गेल्या वर्षी ही त्यांनी कोल्हापूर सांगली महापूर वेळी मदत कार्य केले होते .आता ही सामाजिक बांधिलकी म्हणून मी एक जबाबदार जावलीकर अभियानास प्रतिसाद देत तीन ऑक्सीजन मशीन सुपूर्द केल्या त्या बद्दल त्यांचे अभियानाचे वतीने सयाजीराव शिंदे आभिनंदन केले .
याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी, संजय म्हसकर, दत्ता पवार , श्रीकांत केसकर, हरिदास बागडे,विजय ह. शिंदे, अनिल कदम, धिरेश गोळे, मंगेश शेलार, संदीप धनवडे, शेलेंद्र धोंडे, रवी कदम, अजित पवार अश्या अनेक दानशूर व्यक्तींनी मुंबईतून मदत केली आहे.
जावलीचे तहसीलदार शरद पाटील , गट विकास अधिकारी सतीश बुद्धे , तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.भगवान मोहिते, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रच्या डॉ.साधना कवारे, आखाडेच्या सरपंच सरिता शेलार,.कोविड इमरजगन्सी ग्रुपच्या जयश्री शेलार, साक्षी सुर्वे .विजय सपकाळ, शशिकांत गुरव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व देणग्यांचा स्विकार करण्यात आला.
कुडाळ ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणेने साकारणारा कोविड सेंटर उपक्रम आदर्शवत
कोरोना बाधित रुग्णांचे आँक्सिजन व व्हेन्टिलेटर वाचून प्राण जात असल्याचे पाहून कुडाळ येथील युवकांनी स्वयंप्रेरणेने लोकसहभागातून कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आँक्सिजन सह आठ बेडच कोविड कक्ष तयार केला आहे.येणाऱ्या संकटाची चाहुल पाहुन युवकांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कोविड कक्ष उपक्रम आदर्शवत असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.