सूर्यकांत जोशी कुडाळ – बाल हट्टापुढे नेहमीच सर्वांना झुकावे लागते.अगदी कोणी मंत्री असो की वरीष्ठ अधिकारी असो कोणत्याही स्तरातील व्यक्तीला लहानग्याव्या हट्टापुढे पाझर फुटतोच.आज दुपारी कुडाळच्या इंदिरा नगर चौकात पीएसआय कदम व त्यांचे सहकारी नाकाबंदी करुन विनाकारण रस्त्यावर फिरणारांवर कारवाई करत होते.पोलिसांच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले होते.पण याच चौकात रहात असलेल्या पाच वर्षांच्या तन्मय श्रीकांत पंडित या चिमुरड्यां मधील पोलीस अधिकारी जागा झाला आणि त्याला पोलिस होण्याचा मोह आवरेना.त्याने आई वडिलांकडे रडून हट्ट करून आपला पोलिसांचा ड्रेस घातला आणि चौकात पोलिसांबरोबर उभे राहण्यासाठी हट्ट धरला.
अंगात खाकी वर्दी, डोक्यावर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे पी कॅप डोळ्यांवर गॉगल,तोंडांत शिट्टी आणि हातात काठी घेऊन मोठ्या रूबाबदार साहेब चौकात दाखल झाले.चिमुरड्याचा हा रुबाब आणि पोलिस बनुन सेवा बजावण्याचा हट्ट पाहुन पीएसआय कदम सुद्धा थोडावेळ अवाक् झाले.कोरोनामुळे मानसिक ताणतणावात या चिमुरड्याचे पोलिसी हावभाव पाहुन तिथे ड्युटीवर असणारे पोलिसांच्या मनाला ही थोडा विरंगुळा मिळाला.
पीएसआय कदम यांनी ही त्यांचे नाव गाव विचारून तू मोठा झाल्यावर नक्कीच मोठा पोलिस अधिकारी होणार आहेस.असे सांगितले.विविध प्रसारमाध्यमांतून कोरोना प्रतिबंधात्मक दिल्या जाणाऱ्या सूचना आता अगदी लहान मुलांनाही तोंडपाठ झाल्यात.बाहेर फिरणाऱ्यावर या पाच वर्षांच्या तन्मय ने या सूचनांचा भडीमार करुन चांगलीच समज दिली. यावेळी लोकांना विनाकारण बाहेर पडू नका. बाहेरुन घरात येणाऱ्यांच्या हातावर सॅनिटायझर द्या.किंवा साबनाने स्वच्छ हात धुवायचे.घरातून बाहेर पडण्यापूर्वी तोंडाला मास्क लावा.अशा सूचना तन्मय ने केल्या. हा छोटा पोलीस एका बाजूला उभा राहून आपले कर्तव्य पार पाडत होता. परंतू सद्यस्थिती पाहून पीएसआय कदम यांनी त्याला तू घरी जाऊन तुझी ड्युटी कर.आपल्या घरातील लोकांना नियम पाळायला लाव असे सांगितले.आणि हा चिमुकला तन्मय ड्युटी करण्यासाठी आपल्या घरी गेला.
गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन हरसंभव प्रयत्न करत आहे.कोरोना पासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी अनेक निर्बंध घातले गेले आहेत.अनेक नियम केले आहेत.दररोज प्रसिद्धी माध्यमांतून कोरोनाबाबतचे वास्तव पहावयास मिळत आहे.त्यामुळे सध्याची गंभीर परिस्थिती अगदी चिमुकल्या मुलांच्या मनावरही बिंबवली गेली आहे.हेच आज तन्मय ने दाखवून दिले.