Sunday, April 5, 2026
HomeTop Newsकोरोना मुळे निराधार होणा-या मुलांना महाराष्ट्र सरकारचा आधार.

कोरोना मुळे निराधार होणा-या मुलांना महाराष्ट्र सरकारचा आधार.

महाराष्ट्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ;

सूर्यकांत जोशी कुडाळ ; दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे निराधार होणा-यां मुलांचा सांभाळ करण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे.

         यापूर्वी दिल्ली च्या केजरीवाल सरकारने कोरोना मुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत , कमावत्या पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला, कमावत्या पत्नीचा मृत्यू झाल्यास पत्नीला, कमावत्या मुलांचा मृत्यू झाला तर आई-वडील यांना मासिक अडिच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता.

          या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारनेही निराधार मुलांना आधार देण्याची घेतलेली जबाबदारी निश्चितच स्वागतार्ह आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page