Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsकोविड रुग्णसेवेसाठी सोमर्डी ग्रामीण रुग्णालय सज्ज ; ३० ऑक्सिजन बेड ची सोय.

कोविड रुग्णसेवेसाठी सोमर्डी ग्रामीण रुग्णालय सज्ज ; ३० ऑक्सिजन बेड ची सोय.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ व करहर विभागाला वरदान ठरलेले सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालय आता कोविड योद्धा बनून रुग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे.या रुग्णालयात आता तीस आॅक्सिजन बेडची सुरू करण्यात आलेली सुविधा कोविड रुग्णांसाठी संजीवनीच ठरणार आहे.

      आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रुग्णालयात नुकतीच नवीन एक्सरे मशीन उपलब्ध करून दिली आहे.याचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णांना नक्कीच होतं आहे.

          सर्व जिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.त्यानंतर मेंढा येथे गेल्या वर्षी ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यात आली होती.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्याने उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते यांनी अत्यंत जलद गतीने सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात तीस आॅक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली आहे.

          या कोविड सेंटरचा शुभारंभ प्रत्यक्ष कोविड रुग्ण दाखल होऊन झाला. सध्या या रुग्णालयात चौदा कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.रुग्णालयात सध्या पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नलावडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page