Thursday, February 19, 2026
HomeTop Newsखा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून कुडाळ येथे साकारणार संरक्षक भिंत...

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून कुडाळ येथे साकारणार संरक्षक भिंत व सेल्फी पॉईंट :

कुडाळ दिनांक 25 (प्रतिनिधी) –जावली  तालुक्यातील निसर्ग प्रेमिंसाठी मार्गदर्शक ठरलेल्या पिंपळबन व बालोद्यान प्रकल्पाच्या वैभवात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उद्याना लगत खा. श्री. छ.उदयनराजे भोसले  यांच्या फंडातून संरक्षक भिंत व सेल्फी पॉईंट साकारणार आहे. सुमारे दहा  लाख  रुपये  खर्चून  होत असणाऱ्या या कामाचा  शुभारंभ नुकताच  करण्यात आला.

              शहरा प्रमाणेच  आपल्या गावात सुद्धा अबाल वृद्ध व महिलांना विरंगुळा  मिळावा. यासाठी निसर्ग प्रेमी युवक ग्रामस्थांच्या संकल्पनेतून पिंपळबन निर्माण करण्याचा निर्णय झाला.या समाजाभिमुख उपक्रमाला ग्रामस्थांसह निसर्ग प्रेमिनी प्रतिसाद देत आर्थिक योगदान दिले. त्यामुळे अल्पवधीतच गावातील निरुपयोगी व पिढ्यान पिढ्या पडिक राहिलेल्या जागेवर आज पिंपळबनच्या माध्यमातून नंदनवन फुलले आहे. पिंपळबनच्या संकल्पनेला कुडाळ गावातील जेष्ठ व युवा वर्गाने नियोजन बद्ध काम करुनमूर्त रुप दिले आहे.  पिंपळ  व वडाच्या  झाडांसह पिंपळबानातील  सुशोभीकारणासाठी  लावलेली  विविध प्रकारच्या झाडानी आता दौलदार रूप धारण  केले आहे.बालोद्यानातील खेळ उपकरणे तसेच  ओपन जिम चा आस्वाद अबाल वृद्ध  घेत आहेत.

             पिंपळबनची ही यशोगाथा भावी पिढ्यांना चिरकाल मार्गदर्शक ठरणारी असून ग्रामस्थांच्या या समाजउपयोगी धडपडीची दखल घेत खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी खासदार फंडातून केलेल्या सहकार्यामुळे पिंपळबनाच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याची मते पिंपळबन समितीचे सदस्य व कुडाळ ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.

                 कुडाळ ता.जावळी येथील पिंपळबन उद्यानालगत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे व सेल्फी पॉईंटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज कुडाळ ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कुडाळ गावातील सर्व ग्रामस्थ, निसर्गप्रेमी व विविध पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, यात्रा कमिटी सदस्य, युवा वर्ग उपस्थित होते. यावेळी माहीती देताना पिंपळबनचे संकल्पक महेश पवार म्हणाले, पिंपळबन उद्यानाला येणाऱ्या काळामध्ये अधिक मदत व अधिक चांगलं मोहक रूप देण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थांचा असून, मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे माध्यमातून श्री. पिंपळेश्वर मंदिर ते पवारआळी रस्त्यालगत ( पिंपळबनसाठी ) १० लाख रुपये फंड मंजूर करण्यात आला आहे, सदरची संरक्षक भिंत व जावली तालुक्यातील पहिला सेल्फी पॉईंट यानिमित्ताने पिंपलबनमध्ये साकारला जाणार आहेजावली तालुक्यातील सर्वात मोठा सामाजिक ,नैसर्गिक व लोकसभागातून सुरू असणाऱ्या कुडाळ येथील पिंपळबन उपक्रमासाठी आजपर्यंत अनेक दानशूर व्यक्तीनी आपापल्या परीने मदत केली आहे, नव्याने होत असलेल्या संरक्षण भिंत व सेल्फी पॉईंटच्या कामामुळे पिंपळबनच्या सुशोभीकरणासाठी अधिक बळ मिळाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page