Thursday, February 19, 2026
HomeTop Newsचौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच धक्का बुक्की ; हुमगांव येथील आरोपी वर गुन्हा...

चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच धक्का बुक्की ; हुमगांव येथील आरोपी वर गुन्हा दाखल

सूर्यकांत जोशी – दाखल फिर्यादी नुसार हुमगांव येथे चौकशी साठी गेलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे हवालदार पद्मसेन संभाजीराव घोरपडे वय २९ यांना संबंधित आरोपी संतोष व्यंकट पवार वय ३५ याने धक्का बुक्की करुन मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला. याकामी संबंधित आरोपी विरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी आहे.नमूद 

तारखेस वेळी व ठिकाणी यातील यातील आरोपीत मजकूर याने फिर्यादी हे सरकारी गणवेषात असताना व फिर्यादी हे त्यांचे सरकारी काम करीत असताना फिर्यादी यांना  आरोपीत मजकूर याने धक्काबुक्की करुन उजव्या हाताने फिर्यादीच्या छातीवर फाईट मारून तसेच  आरोपी याने त्याचे उजवे हातातील कडे फिर्यादीस जोरात मारून जखमी केले आहे  सदरची फिर्याद फिर्यादी यांनी औषध उपचार घेत असताना दिले वरून   गुन्हा रजि दाखल करण्यात आला .

    मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली.मेढा पोलिस ठाणे अंकित कुडाळ पोलिस दूरक्षेत्र पीएसआय कदम अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page