कुडाळ प्रतिनिधी –
सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारे, त्यांच्या हालअपेष्टा स्वतः अनुभवल्या असलेले आणि जमिनीवर पाय रोवून उभे असलेले नेतृत्व म्हणजे राजेंद्र शिंदे (काका). सामान्य माणसाच्या जगण्यातून घडलेले हे नेतृत्व आज पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाचा कौल मिळवण्यासाठी मैदानात उतरले असून, “पवार साहेबांची तुतारी” येत्या निवडणुकीत बहुमताने विजयी होणार, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
या निवडणुकीत पैसेवाल्यांची मतेदारी मोडीत काढण्यासाठीच जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटाची उमेदवारी सौ. पूनम प्रशांत नायकुडे या सामान्य कुटुंबातील भगिनीला देण्यात आली आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा लोकशाही वरील विश्वास दृढ करण्यासाठी आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकारणात येऊन समाजसेवेची संधी देण्यासाठी मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला न भुलता निर्भीडपणे मतदान करून तुमच्या आमच्यातील या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आव्हान करण्यात येत आहे.
ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचा आदर करणारे, कारखान्यात राबणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून राजेंद्र शिंदे (काका) यांची ओळख आहे. धनाच्या जोरावर सत्ता मिळवण्याच्या राजकारणापेक्षा जनतेच्या पाठबळावर परिवर्तन घडवण्याचा त्यांचा निर्धार आज मतदारांच्या मनाला थेट भिडत आहे.
“धनशक्ती नव्हे, जनशक्तीच जिंकणार”—हा विश्वास घेऊन सामान्य शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनता एकवटत आहे. स्वार्थी राजकारणासाठी ऊस उत्पादकांना व कामगारांना देशोधडीला लावणारे, ठेकेदारीला पोसणारे आणि दहशतीच्या राजकारणाने समाजात भीती निर्माण करणारे प्रवाह आता जनतेच्या न्यायनिष्ठ निर्णयामुळे हद्दपार होणार, असा ठाम सूर उमटत आहे.
गावोगावी होत असलेल्या बैठका, संवाद आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहता निवडणूक लढत केवळ राजकीय नसून ती स्वाभिमानाची, न्यायाची आणि सर्वसामान्यांच्या भवितव्याची ठरत असल्याचे स्पष्ट होते. या लढतीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याची दिशा आता स्पष्ट होत चालली आहे—
पवार साहेबांची तुतारी निवडून येणार, आणि जनतेचा आवाज पुन्हा एकदा विजयी होणार!