Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजयश्री गिरी व सौरभ शिंदे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार :कुडाळ...

जयश्री गिरी व सौरभ शिंदे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार :कुडाळ जि. प. गटातील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ:

कुडाळ – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ जयश्री सुहास गिरी व कुडाळ पंचायत समिती गणाचे  उमेदवार सौरभ राजेंद्र शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कुडाळ येथील प्रसिद्ध नटराज युवक मंडळाच्या गणपती समोर नारळ वाढवून करण्यात आला.

           यावेळी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जयश्री गिरी व सौरभ शिंदे यांच्यासह  प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे, माजी व्हाईस चेअरमन अंकुशराव शिवणकर संचालक प्रदीप तरडे, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई बारटक्के,माजी सभापती सुहास गिरी, हेमंत शिंदे,मच्छिंद्र मुळीक, लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता सौरभ शिंदे, समीर आतार, धनंजय केंजळे, तुकाराम तरडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजेंचे नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासाला मत द्या – सुनेत्रा शिंदे 

       राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा आपणास विश्वास आहे नामदार शिवेंद्रसिंह राजेंची माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू असून या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आपले बहुमोल मत भाजपच्या सौ जयश्री गिरी व सौरभ शिंदे आणि चारुशीला पवार या  उमेदवारांना द्यावे. गेल्या आठ दिवसात समाजाच्या सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा पाहता कुडाळ गट व गणातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी श्रीमती सुनेत्रा  शिंदे यांनी व्यक्त केला.

           यावेळी कुडाळ गावातून निघालेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते महिला व युवक सहभागी झाले होते. उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास या निवडणुकीतील यशाची झलक दाखवून देत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page