Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीतील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करा.सौरभ शिंदे

जावलीतील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करा.सौरभ शिंदे

अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना निवेदन

अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना निवेदन देताना सौरभ शिंदे ,सोमनाथ कदम व सदस्य.

कुडाळ – जावली तालुक्यातील अवैध दारूविक्री व मटका धंदा यावर आळा बसण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई असे निवेदन जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी सातारा जिल्हाचे  अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांना नुकतेच दिले.

                यावेळी कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम, सदस्य धैर्यशील शिंदे,दिलीप वारागडे, आशिष रासकर उपस्थित होते.

            यावेळी सौरभ शिंदे यांनी  कठोर कारवाई केल्या शिवाय या धंद्यांना आळा बसणार नाही अशी भूमिका सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक धिरज पाटील साहेब यांना भेटून मांडली. यावर पाटील यांनी त्वरीत कारवाई चे आदेश दिले त्याबद्दल सौरभ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page