एकूण २०९६, डिस्चार्ज १८९२, बळी ६१,अँक्टिव्ह १४३
सूर्यकांत जोशी कुडाळ – बुधवारी रात्री आलेल्या अहवालात कुडाळ येथील २, जवळवाडी १, व ओझरे १ अशा ४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे तर आज २१ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
कोरोनाची दहशत संपली ; जनजीवन पूर्वपदावर
सुरुवातीला असणारी कोरोनाची दहशत आता संपली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आता प्रत्येक जण सुज्ञ झाला आहे. तालुक्यातील रायगाव येथील कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण २१७ बेड आहेत. या ठीकाणी सध्या केवळ पाच रुग्ण दाखल आहेत. तर मेढा येथील डीसीएचसी सेंटर मध्ये तीस बेड असून या ठिकाणी एक रुग्ण दाखल आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे १४३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. पैकी १३७ रुग्ण होम आयसोलेट आहेत. त्यामुळे लोक आता कोरोनाशी लढाईला सज्ज आहेत. हे दिसून येते.
