Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत आक्टोबर महिन्यात ५०२ कोरोना पाँझिटीव्ह ;१८ मृत्यू,आज सात पाँझिटीव्ह

जावलीत आक्टोबर महिन्यात ५०२ कोरोना पाँझिटीव्ह ;१८ मृत्यू,आज सात पाँझिटीव्ह

२२५४, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह १६२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात  आक्टोबर महिन्यात महिन्यात ५०२  जण कोरोना बाधित झाले तसेच या महिन्यात १८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.  सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हा संसर्ग निम्म्या वर आहे सप्टेंबर महिन्यात १०११  जण कोरोना बाधित झाले होते तर चोवीस कोरोना बाधितांचा मृत्यू   झाला होता  एकूण कोरोना बाधित २२५४ असून पैकी २०३०  जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोना मुळे  ६२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत ,तर  १६२ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

     जावलीत शनिवारी रात्री सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये गांजे १, सांगवी कुसुंबी २, मालचौंडी १, सरताळे ३ यांचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

         दरम्यान आक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. परंतू धोका टळलेला नाही. आक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page