Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आज कोरोनामुळे एक मृत्यूची नोंद ; आज २७ जण कोरोना...

जावलीत आज कोरोनामुळे एक मृत्यूची नोंद ; आज २७ जण कोरोना बाधित

एकूण – १५७२ , डिस्चार्ज ११६९, बळी ४२ ,अँक्टिव्ह ३६१

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूची शृंखला सुरुच आहे.  गुरुवारी कुडाळ येथील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू  झाला आहे.तालुक्यात सप्टेंबर महिन्यात  कोरोना मुळे पंचवीस दिवसात २१ मृत्यूंची नोंद झाली असून तब्बल ८०० जण कोरोना बाधित झाले असल्याची नोंद   झाली आहे .

        दरम्यान आज २७ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये करंदी तर्फ कुडाळ ८,  सरताळे १,कुडाळ १,मेढा 3,खर्शीबारामुरे १,भणंग ९, शिंदेवाडी २,म्हाते खु.१,मोहाट १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

मेढा आणि कुडाळ मध्ये सातत्याने वाढ

      जावली तालुक्यातील सर्वात मोठी गावे असणाऱ्या मेढा व कुडाळ मध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मेढा येथील एकूण कोरोना बाधितांचा आकडा २६४ वर पोहचली असून २ जणांचा बळी गेला आहे. तर कुडाळचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा ९५ झाला असून चार जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.

 नवरात्रोत्सव साजरा करता येण्यासाठी  कोरोनाला रोखणे आवश्यक

        नवरात्रोत्सव आता जवळ येऊ लागला आहे. परंतू दररोज कोरोना बाधितांची वाढणारी संख्या पाहता या उत्सवातील उत्साहावर कोरोनाचे सावट राहण्याची शक्यता आहे. नवरात्री साठी अजूनही आपल्या हातात तीन आठवड्याचा अवधी आहे. या कालावधीत लोकांनी नियम व संयम पाळल्यास कोरोनाला रोखता येणार आहे.त्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तरी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page