एकूण – १६३३ , डिस्चार्ज १२३१, बळी ४५ ,अँक्टिव्ह ३५७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी कुडाळ येथील ६० वर्षीय पुरुषाचा व शनिवारी करंदी येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ४५ वर पोहचली आहे.तालुक्यात गेल्या सव्वीस दिवसात कोरोना मुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अँन्टीजेन टेस्ट मध्ये १४ जणांचा अहवाल पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये सरताळे २, गांजे ४, निझरे २,सायगांव १, मेढा १, म्हाते खुर्द १, कुडाळ २,करंदी तर्फ कुडाळ १ यांचा समावेश आहे.
आज रात्री आलेल्या अहवालात १५ जण कोरोना पाँझिटीव्ह आहेत .यामध्ये करंदी तर्फ कुडाळ 3,सरताळे १,बामणोली तर्फ कुडाळ 3,कुडाळ 2,मेढा १,
तांबी कुसुंबी 3,मोहाट १,करंजे १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
बाजार पेठांतील गर्दी काळजी वाढवणारी
या महिन्यात कोरोनाचे बाधित व बळींचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनावर दडपण असले तरीही दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पासून सावध राहण्यासाठी खबरदारी सुजाण नागरिक घेत आहेत. तसेच नियम न पाळणारी व्यक्ती जवळ येताच अनेकांना संताप अनावर होत आहे.
अतिआत्मविश्वासच आत्मघातकी ठरत आहे
कोरोनाची या महिनाभरात मनात धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. परंतु सामाजिक दडपण किंवा हा आजार सहज घेणाऱ्यांचीही संख्या भरपूर आहे. जरी कोरोनाची लक्षणे असली तरीही मला काही कोरोना होणार नाही. मला काही होत नाही.अशी मनाची समजुत घालून घरगुती अथवा स्थानिक वैद्यकीय उपचार घेण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. तर वेळीच उपचार न घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतत आहे. अतिआत्मविश्वासच अनेकदा आत्मघातास कारणीभुत ठरत आहे.
